आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरमरीत टीका:ईशान्य भारतात भाजपने हिंदूविराेधी पक्षासाेबत जाऊन काय साधले?

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“नुकत्याच पार पडलेल्या ईशान्य भारतातील तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाने यश मिळवले. परंतु त्यानंतरही त्यांनी हिंदूविराेधी पक्षासाेबत जाऊन नेमके काय साधले?’ असा प्रश्न उपस्थित करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाजपचे बेगडी हिंदू प्रेम यानिमित्ताने पाहावयास मिळाल्याची खरमरीत टीका पत्रकारांशी बोलताना केली आहे. दवे म्हणाले, मेघालय, नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काेनराड संगमा यांना पाठिंबा देऊन गाेव्याप्रमाणे आपला हिंदुत्ववाद गरजेनुसार असताे, हे भाजपने सिद्ध केले आहे. हिंदुत्ववादी लाेक, संघटना यांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचे काम भाजपने केलेले आहे. आता त्या राज्यात समान नागरी कायदा किंवा गाेहत्याबंदी कायदा यासारखे विषय चर्चेलाही येणार नाहीत. आता भाजपची काँग्रेस हाेत असल्याचे देशभरातील नागरिकांना दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...