आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा भाजपला टोला:बारामतीला धडका मारून काय होणार आहे का? गेल्यावेळेस भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आता भाजप बारामतीत गेले आहेत. बारामतीत धडका मारून काय होणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

मी कुठलीही निवडणूक समोरची व्यक्ती ताकदवान आहे, हे समजून लढतो. पण, मी मैदानात उतरलो आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या 'मिशन बारामती'ला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी 'मिशन 45' आखले आहे. पवारांना धक्का देण्यासाठी भाजपने आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रसकडून भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे.

ते म्हणाले की, दिवस उगवताच कामाला माझी सुरुवात होते. त्यामुळे सलग मला बारामतीकर निवडून देत आहेत. काही दिवस झाले अनेक नेते बारामतीला भेट देत आहे. महाराष्ट्रात कुठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.

तारीख पे तारीख

शिंदे-फडणवीस सरकारवर ते म्हणाले की, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बरेच दिवस दोघेच सरकार चालवत होते. आताही राज्यात कुठेही पालकमंत्री नाही. कुणाचे कुणाकडे लक्ष नाही. राहिलेल्या मंत्रिमंडळात आपला नंबर लागवा, यासाठी ते साकडे घालत आहेत. महाराष्ट्राने असे कधीच पाहिले नव्हते. शिवाय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून तारीख पे तारीख दिली जात आहे. पण असे निर्णय लवकर झाले पाहिजेत. सरकार कधी पडेल काही सांगता येत नाही, म्हणून अधिकारी निवांत आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे

देशातील वाढत्या लोकसंख्येवर अजित पवार म्हणाले, आपली लोकसंख्या वाढत चालली आहे. यात आपला हात कोणी धरूच शकत नाही. चीनलाही आपण मागे टाकू. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जर दोनच मुले असतील तर त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येते. तसेच त्यांचे भविष्यदेखील उज्वल करू शकतो.

'त्या' कबरीवर म्हणाले...

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे तुमच्या सरकारमध्ये सुशोभीकरण झाल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, कोणाचेही सरकार असू द्या ना, तू मुख्यमंत्री असता तर तुझ्या काळातही व्हायला नको होते.

बातम्या आणखी आहेत...