आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पुजा चव्हाण प्रकरणाचे प्रश्न विचारताच पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा पत्रकार परिषदेतून हसत-हसत काढता पाय

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची आयुक्तांनी उत्तरे दिली नाही

सध्या राज्यात गाजत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर पुणे पोलिसांनी कुठलीही ठोस माहिती दिलेली नाही. दरम्यान, आज याबाबत पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींकडून प्रश्न विचारल्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हसत-हसत काढता पाय घेतला.

राज्यातील राजकारणात सध्या पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाचीच चर्चा आहे. या प्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्ट मार्टम अहवाल नेमका काय आले आहे, यासारखे प्रश्न विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसत-हसत आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले. तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता पुण्याचे पोलिस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

बातम्या आणखी आहेत...