आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कधी करणार?:3 सरकार बदलली आता तरी जाग येणार का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा शासनाला सवाल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला. यानंतर तीनवेळा महाराष्ट्रात सरकार बदलले.पण कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी कोणत्याही सरकारला वेळ झाला नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे नमूद करून नवीन सरकार तरी हे नियम करणार का? असा सवाल महाराष्ट्र 'अंनिस'मार्फत मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे गुरुवारी केला आहे.

हमीद दाभोळकर म्हणाले, महाराष्ट्र अनिसचे संस्थापक कार्यध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खुनाला 20 ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलीदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादुटोणा विरोधी कायदा केला पण अपेक्षित नियम केव्हा करणार हेही अनुत्तरीत आहे.

हमीद दाभोलकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांच्यामध्ये म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनाच्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले, म्हणून नातेवाईकानी मारहाण केल्याने झालेला मृत्यू, अशा अनेक मानवतेला काळिमा फासणाऱ्या अंधश्रद्धा विषयक घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत अशी आमची अपेक्षाही हमीद यांनी व्यक्त केली.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या कायद्याअंतर्गत नमूद केलेल्या दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे हेही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी एक नोडल पोलिस अधिकारी नेमणे आवश्यक आहे.

1 हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल

शासनाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी साठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अंनिस सारख्या संघटना आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षात एक हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील काही गुन्ह्यांमध्ये लोकांचे शोषण करणाऱ्या बाबा- बुवांना शिक्षाही झाली. यामध्ये सर्व धर्मातील बाबा-बुवांना शिक्षा झाल्याचे वास्तव देखील पुढे आले आहे असे महाराष्ट्र अनिस कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव आणि मिलिंद देशमुख यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...