आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पस्तीस लाखांच्या गाड्या पोलिसांकडे येतात कुठून? उपमुख्यमंत्री अजित पवारांना पडला प्रश्न

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत असताना मला काही पाेलिस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चाैकशी केली असता समजले की, उद्याेगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. त्यामुळे अनेकांची बोलती बंद झाल्याचे दिसले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सरकारी नोकरी करणाऱ्यांनी काेणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पाेलिस शासनाचे कर्मचारी असून उद्याेगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री काेणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पाेलिस अधिकारी काेणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते. पाेलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पाेलिसांच्या घराचे काम सरकार प्राधान्याने करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...