आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बिबट्याची सुखरूप सुटका:शिकारीमागे धावताना 45 फूट खोल विहिरीत पडला, डरकाळ्यांनी दणाणून सोडला परिसर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हयातील ओतूर तालुक्यातील बेल्हे गावात ४५ फूट खोल विहिरीत अडकलेल्या बिबट्याची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. शिकारीच्या मागे धावत सुटलेला हा बिबट्या कठडे नसलेल्या विहिरीत सोमवारी (ता. 6) पडला होता. पोहून थकल्याने मदतीसाठी बिबट्या वारंवार डरकाळ्या फोडत होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची सकाळ बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून गेली होती.

असे काढले बाहेर

बिबट्याच्या डरकाळ्या ऐकताच ग्रामस्थांनी त्वरित ओतूर वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी आणि वाईल्डलाईफ एसओएस संस्थेचे पथक घटनास्थळी पोहोचण्याआधी विहिरीत एक खाट सोडण्यात आली होती. दीर्घकाळ पोहून बिबट्या थकला असल्याने त्याने लगेच खाटेवर उडी मारली. रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचताच बिबट्याला वर खेचण्यासाठी पिंजरा दोरखंडांच्या साह्याने विहिरीत सोडला. कोरड्या जागेसाठी आसुसलेल्या बिबट्याने लगेच पिंजऱ्यात उडी मारली. त्यानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पुन्हा जंगलात सोडले

सर्वप्रथम माणिकडोह बिबटे निवारा केंद्रात बिबट्याची संपूर्ण वेद्यकीय तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी सांगितले की, ‘हा बिबट्या नर असून, त्याचे वय सुमारे दीड वर्षांचे असावे. बिबट्याला कोणतीही इजा झालेली नव्हती. तो पोहून मात्र थकला होता. त्यामुळे त्याला काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. पुरेशी विश्रांती होताच बिबट्याला वनविभागाच्या देखरेखीखाली नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले’.

कठडे नसलेल्या विहिरींचा धोका

ओतूर वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले की, ‘स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बिबट्या सतत पोहत राहिल्याने थकला होता. त्यामुळेच विहिरीत खाट सोडताच, तो पटकन त्यावर चढून बसला. त्यामुळे पिंजरा येईपर्यंत त्याला जरा विश्रांती मिळाली. त्याला कुठल्याही जखमा झालेल्या नव्हत्या. वाइल्डलाइफ एसओएसचे कार्तिक सत्यनारायण म्हणाले,‘खुल्या, कठडे नसलेल्या विहिरी हा प्राण्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करत आहोत.’

सुटकेनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सुटकेनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
पोहून पोहून बिबट्या थकल्याने विहिरीत खाट टाकण्यात आली होती.
पोहून पोहून बिबट्या थकल्याने विहिरीत खाट टाकण्यात आली होती.
दोरखंडांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.
दोरखंडांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...