आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Who Should Sit On The Chair In CM's House? Saying It Is Not Important, Ajit Pawar's Anger At The Working President Of 'Nationalist Youth'

CM च्या घरातील खुर्चीवर कुणी बसावे?:हे महत्त्वाचे नाही म्हणत, अजित पवारांचा 'राष्ट्रवादी युवक'च्या कार्याध्यक्षाला घरचा आहेर

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीच बसतात. एक खुर्ची मंत्रालयात आहे, आणि दुसरी खुर्ची घरी आहे. घरच्या खुर्चीवर कुणी बसावे हा त्यांचा निर्णय कारण ते त्यांचे घर आहे, या गोष्टीला आपण महत्व देऊ नये. लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. पुण्यात राष्ट्रवादी पक्षकार्यालात आढावा बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

ठाकरेंना परवानगी याचा आनंद

अजित पवार म्हणाले, माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असतील हे बाळासाहेबांनी हे सांगितले होते. एखाद्या गोष्टीत न्याय मिळाला नाही तर आपण न्यायव्यवस्थेकडे जातो. शिवसेनेला आज न्याय मिळाला याचा आनंद झाला. एकनाथ रावांचे विचार ऐकायचे त्यांनी तिकडे जावे. ज्यांना ठाकरेंचे विचार ऐकायचे त्यांनी तिथे जावे. तिथे मात्र माध्यमांची अडचण होईल की, कुणाला दाखवावे.

ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे

अजित पवार म्हणाले, महागाई आणि बेरोजगारी हा प्रश्न गंभीर बनला आहे. वैचारिक मतभेद असू शकतात परंतु खालच्या पातळीवर टीका करणे महाराष्ट्राची परंपरा नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी आमदार विसरलेले दिसतात. प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान केला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 40-50 वर्षापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परंपरा सुरू केली. प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे.

एकता, अखंडत्वाला धोका

सध्या खोके, गद्दार, 50-50 शब्द खूप गाजत आहे. राज्यात महत्वाचे प्रश्नावर दुर्लक्ष सुरू असून वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. पंतप्रधान पदावर काम करताना काश्मीर ते कन्याकुमारी आपला भाग असल्याचे मानले पाहिजे परंतु त्याचा विसर पडत आहे. आज देशाच्या एकता आणि अखंडता यांना धोका आहे हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले आहे.

आम्ही दोन्ही काळ पाहिला

अजित पवार म्हणाले, राज्यात मला सर्वाधिक सभासद नोंदणी संख्या पुणे जिल्हा आणि शहराची झालेली हवी आहे. संघटनेच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. सत्ता असताना आणि नसताना आपण दोन्ही काळातील दिवस पाहिले आहे. महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवून महापौर करायचा आहे. कोणाचा कोणताही बालेकिल्ला नसतो, आपण मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

आपल्याला चिंतन करावे लागणार

अजित पवार म्हणाले, मतदारांशी सातत्याने हितगुज करताना केवळ आंदोलन करून चालणार नाही तर जनतेसाठी कार्यक्रम घ्यावे लागतील. प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असून त्याबाबत जागृती जनतेत केली पाहिजे. याबाबत राज्यात सर्वाधिक आंदोलन पुण्यात झाली आहे. प्रत्येक प्रभाग, वार्ड मध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार आहे का? याबाबत चिंतन करावे लागणार आहे. प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार दिला गेला पाहिजे, त्यासाठी दुसऱ्या पक्षातील इच्छुक उमेदवार कोण याबाबत चाचपणी केली पाहिजे. निवडून येण्याची कोणाची क्षमता आहे, सर्वांना कोण सोबत घेऊन काम करते, लोकप्रिय कोण आहे या गोष्टी तपासल्या पाहिजे. प्रभाग तीनचा पाहिजे की चारचा याबाबत वाद न्यायालयात गेला असून नेमका काय निकाल लागेल हे माहिती नाही परंतु आपण निवडणूक तयारी केली पाहिजे.

एकनाथ शिंदेंना काय झाले कळेना

अजित पवार म्हणाले, मागील अडीच वर्षात अनेक चांगल्या इमारती राज्यात आणि पुण्यात निर्माण करण्याबाबत प्लॅन मंजूर केले. मात्र, टिकाव टाके पर्यंत एकनाथ शिंदे यांना काय झाले काय माहिती ते वेगळे झाले. नाहीतर आपण चांगल्या प्रकारे पुढील काळात विकास कामे करू शकलो असतो. मी जोपर्यंत पदावर होतो तोपर्यंत सुंदर शासकीय इमारत पूर्ण करण्याबाबत काम केले. जाणीवपूर्वक पत्रचाळ प्रकरण सारखे मुद्दे नागरिकांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी बाहेर काढले जातात.

बातम्या आणखी आहेत...