आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकवरुन फ्रिस्टाईल!:ऑर्डर केलेल्या केकवरुन वाद; हाॅटेलमालक, बाऊन्सरची ग्राहकांना बेदम मारहाण

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एक तरुण मित्र मैत्रिण आणि एक दाम्पत्य हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले. एकाच वेळी दोघांनीही केकची ऑर्डर केली. सेलीब्रेशनचा केकही आला; पण संबंधित केक नेमका कुणाचा यावरून वाद झाला यात हाॅटेल मालक आणि बाऊन्सरने् उडी घेत त्यांनी ग्राहक तरुणांना बेदम मारहाण केली. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी घडला.

या प्रकरणी हॉटेल मालकासह बाऊंसर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सोमवारी दिली आहे. आर. सिद्धार्थ आणि त्याचा मित्र दिपक कुलकर्णी यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्याचे मित्र दीपक कुलकर्णी, त्याची एक मैत्रिण तसेच चुलत भाऊ यांच्यासह बाणेर येथील महाबळेश्वर चौकातील ठिकाणा बार या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी 19 जून रोजी रात्री बारा वाजता गेले होते. यावेळी त्यांनी केकची ऑर्डर दिली होती.

त्यांनी दिलेल्या ऑर्डर नुसार त्यांचा केक त्यांच्या टेबलवर आला. मात्र, त्यांच्या शेजारी बसलेल्या एका जोडप्यातील मुलीने थेट फिर्यादीजवळ येत हा केक आमचा आहे. मी तो माझ्या बॉयफ्रेन्डसाठी मागवला असल्याचे सांगत ती तरुणी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांशी हुज्जत घालायला लागली. यावेळी हॉटेलचालक आणि त्याचा बाउन्सर त्या ठिकाणी आले.

यावेळी हा वाद सोडवण्याऐवजी त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी सिद्धार्थ आणि त्याचा मित्र कुलकर्णी हे जखमी झाले. तसेच सर्वांना हॉटेल मालकाने बाहेर काढले. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी उपचार घेत थेट चतुश्रृंगी पोलिस ठाणे गाठले. यानंतर या प्रकरणी हॉटेल मालक आणि बाऊंन्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...