आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:हाथरस प्रकरणाचा बोलबाला करणारे शिरूर घटनेबाबत गप्प का आहेत? विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांचा सवाल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत : डॉ. कोल्हे

हाथरस प्रकरणाचा बोलबाला करणारे आता कुठे झोपले आहेत. मुंबई-महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर शुक्रवारी निशाणा साधला. शिरूरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका झोपडीत राहणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. रात्रीच्या वेळी ही महिला शौचाला जात होती. या वेळी अज्ञाताने तिच्यावर हल्ला चढवला. महिलेने विरोध केल्याने धारदार शस्त्राने तिचे डोळे निकामी करण्यात आले. अद्याप हल्लेखोर फरार आहे. यानंतर प्रवीण दरेकर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार यावर काही करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

सध्या या पीडितेवर पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरेकर यांनी रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्यासोबत संबंधित विषयावरती चर्चा करून लवकरात लवकर आरोपींना अटक करून कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली. या वेळी पुणे भाजप शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे ,युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रा.सचिन जायभाये, बाप्पु मानकर आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ही घटना मानवतेला काळी फासणारी असून हाथरस प्रकरणाचा बोलबाला करणारे आता कुठे झोपले आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत : डॉ. कोल्हे
पीडितेच्या डोळ्याबाबत रुग्णालय प्रशासनाने दिलेली माहिती चिंताजनक आहे. पीडित महिलेला डोळे परत मिळणे अवघड आहे. आता पीडित महिलेला मानसिक आधार अत्यंत गरजेचा आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना आधाराची गरज आहे आणि आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे कोल्हे या वेळी म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ससून भेटीवेळीच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही पीडितेची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
शिरूर येथील महिलेवर जो काही प्रसंग झाला, अशा प्रकारचे कृत्य करण्यास आरोपी धजावणार नाही, असे शासन होईल त्यादृष्टीने कलमे लावण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. दरेकर यांच्या भेटीवेळी खासदार डॉ. कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शिरूर पीडितेची ससून रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.