आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून इंजिनियर पतीकडून पत्नीचा खून:संशयित पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात; पुण्यातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनिअर असलेल्या तरुणाने आपल्या पत्नीच्या चाकूने भोसकून खून केल्याची आज सकाळी घटना उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर येथील भेकराईनगर येथे घडली. या संबंधित प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला ताब्यात घेतले आहे.

अनेक दिवसांपासून होता वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेकराई नगर मधील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास या ठिकाणी गायकवाड दांपत्य राहत होते. राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर म्हणून काम करतो. दरम्यान राजेंद्र गायकवाड हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून दोघात भांडण सुरू होते. आज सकाळी सुद्धा याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात राजेंद्र याने चाकूने पत्नीवर वार केले.. गंभीर जखमी झाल्याने ज्योती गायकवाड यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ज्योती गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तर आरोपी राजेंद्र गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रवासात महिलेचे सव्वा लाखांचे गंठण चोरीला

रिक्षासह पीएमपीएल बसने प्रवास करणार्‍या महिलेकडील पर्समधील 1 लाख 35 हजारांचे सोन्याचे गंठाण चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना नुकतीच हडपसर-स्वारगेट, स्वारगेट- कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हडपसर परिसरात राहायला आहे. 22 ऑक्टोबरला त्यांनी हडपसर ते स्वारगेट रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज पीएमपीएल बसप्रवास केला. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील 1 लाख 35 हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. याप्रकरणी महिलेने उशीरा तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. पोलिस अमलदार अभय झेंडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...