आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने पतीला पेट्रोल ओतून पेटविले:पुण्यातील खराडीत थरारक घटना, नांदवित नसल्यामुळे पत्नीचे पाऊल, तिच्यासह नातेवाईकांवर गुन्हा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पती नांदवित नसल्याच्या रागातून पत्नीने इतर नातलगांच्या मदतीने पतीवर पेट्रोल टाकून आग लावत पेटवून दिल्याची घटना 30 डिसेंबरला संध्याकाळी पाचच्या सुमारास खराडी परिसरात घडली. आगीत भाजल्यामुळे तरूणाचे पोट, पाठ, गळा आणि हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

लखन काळे (वय ३२ रा. शिरूर ,पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि इतर नातेवाईकांविरूद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन मूळचे शिरूरमधील रहिवाशी असून त्यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. त्यांना दोन मुले असून मागील चार वर्षांपासून ते पत्नीला नांदवित नाहीत. त्याचा राग पत्नीला असल्यामुळे ३० डिसेंबरला पती लखन खराडी परिसरात मोकळ्या जागेत थांबल्याची माहिती पत्नीला मिळाली. त्यामुळे तिने लखनला जीवे मारण्यासाठी बाटलीतून पेट्रोल आणून त्याच्या अंगावर टाकले. त्यानंतर त्याच्या अंगावर काडी टाकून आग लावली. त्यामुळे लखन गंभीररित्या जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

नववर्षांचे स्वागत केल्यानंतर रात्री उशिरा पतीसह मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महिलेच्या पाठीत मारून तिचा विनयभंग केल्याची घटना ३१ डिसेंबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास खैरेवाडी परिसरात घडली आहे. त्याशिवाय टोळक्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देउन त्यांच्या डोक्यात मारहाण केली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला पतीसह मैत्रिणीसोबत खैरेवाडी परिसरात गप्पा मारत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी महिलेच्या पाठीत मारून विनयभंग केला. त्यामुळे महिला आणि तिचे पती घाबरून जात असताना टोळक्याने त्यांचा पाठलाग केला. आरोपींना त्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...