आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:जरंडेश्वर कारखान्याचे मालक अजित पवार यांच्या पत्नी, बहीण; किरीट सोमय्या यांचा आरोप, पवारांनी भूमिका स्पष्ट करावी

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेमय्या म्हणाले, जरंडेश्वर सहकारी कारखान्याचा लिलाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केला.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनीच केली आणि बेनामी कंपनीच्या माध्यमातून पत्नी, दाेन बहिणींच्या नावाने खरेदी केला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बहीण नीता पाटील, बहीण विजया पाटील यांचे पती माेहन पाटील हे कंपनीचे खरे मालक असल्याची बाब कागदपत्रांतून समाेर आली आहे. पवार कुटुंबीयांनी बेनामी कंपनीद्वारे मनी लाँड्रिंग केले असून त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजप नेते किरीट साेमय्या यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केली.

साेमय्या म्हणाले, जरंडेश्वर सहकारी कारखान्याचा लिलाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केला. त्यामुळे २७ हजार शेतकऱ्यांच्या शेअर्सचे नुकसान झाले. पवार कुटुंबीयांमुळे त्यांच्या मर्जीतील २२ लाेकांनी लिलावासंबंधी टेंडर पेपर घेतल्यानंतर हा कारखाना गुरू कमाेडिटी सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला विकला गेला. ही कंपनी बेनामी कंपनी निघाली असून त्यांना जरंडेश्वर साखर कारखाना ४५ वर्षांच्या लीजवर देण्यात आला. कारखान्याचे खरे मालक लपवण्यासाठी अजित पवार यांनी अनेक कंपन्यांचे मायाजाल तयार केले. त्यात गुरू कमाेडिटी सर्व्हिसेस लि. स्पार्क्लिंग साॅइल प्रा.लि., फायर पाॅवर मार्केटिंग प्रा.लि, नाॅन काॅन एनर्जीज प्रा.लि., आर्या अॅग्राे बायाे अँड हर्बल्स प्रा.लि, जय अॅग्राेटेक प्रा.लि. कल्पवृक्षा प्रमाेटर्स प्रा.लि., ओंकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, शिवालिक बिल्डर्स प्रा.लि. आदी कंपन्यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचे ९० टक्के शेअर्स स्पार्क्लिंग साॅइल प्रा.लि. कंपनीकडे असून ती पूर्वी जय अॅग्राेटेक प्रा.लि. म्हणून ओळखली जाते.

स्पार्क्लिंग कंपनीची स्थापना अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी केली असून त्यांनी विविध कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. यश-व्ही-जेवेल्स या कंपनीवर शेल कंपनी म्हणून सेबीने २३ एप्रिल २०१९ राेजी एका आदेशाने प्रतिबंध लादले. परंतु त्याद्वारे पवार यांनी मनी लाँड्रिंग केले आहे.

बातम्या आणखी आहेत...