आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पतीकडून पत्नीचा भोसकून खून:चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या; आरोपी पतीस पोलिसांकडून अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवडा येथील जवाननगर येथे एका पतीने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती दिली आहे.

अंकिता अनिल तांबूटकर (वय 45, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, जय जवाननगर, येरवडा,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल मनोहर तांबूटकर (वय 50) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि अनिल तांबूटकर यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. अनिल हा अंकिताच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. अनिलच्या सततच्या त्रासाला अंकिता ही त्रासलेली होती. मात्र, अनिल हा कायम तिच्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यातील भांडणे ही मागील काही दिवसांपासून वाढली होती. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अनिलने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले. त्यांचे हे भांडण टोकाला गेले. राग अनावर झाल्याने अनिलने घरातील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. यामुळे तिच्या जागीच मृत्यू झाला.

या घटनेची महिती ही शेजारच्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, निरीक्षक उत्तम चक्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिसांनी मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शववि्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. आरोपी अनिल पाटील यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे पोलिस चौकशी करण्यासाठी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...