आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पुण्यातील कोथरूड महात्मा सोसायटीत शिरला रानगवा, परिसरात खळबळ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच परिसरात बघ्यांची गर्दी

सध्या पुणे शहर एका पाहुण्याच्या आगमनामुळे चर्चेत आले आहे. कोथरूड परिसरात बुधवारी एक रानटी गवा फिरताना दिसून आला. रानटी गवा शिरल्याची माहिती समजताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सध्या सोशल मीडियावर या रानटी गव्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओत हा गवा भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. दरम्यान वनविभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी गव्याला पकडण्यासाठी कोथरूड परिसरात दाखल झाले आहेत.

मात्र, कोथरूडसारख्या शहरी भागात हा पाहुणा आलाच कसा, असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता वनविभागाने या गव्याला पकडल्यानंतर कदाचित या सगळ्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser