आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यात पुन्हा एकदा गव्याचे आगमन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे या गव्याचे दर्शन झाले. डोंगर आणि जंगल भाग येथून जवळ आहे. तिथूनच गवा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी येथे दाखल झाले आहेत. तसेच गव्याला पकडण्यासाठी चर्चा केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात गवा आला होता. तेव्हा गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि बघ्यांची गर्दी होणारी गर्दी टाळण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. यावेळी गव्याला सुखरुप शहराबाहेर सोडण्यात येण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
यापूर्वी 9 डिसेंबरला पुण्यात गव्याचे दर्शन झाले होते. जंगलातला पुण्याच्या कोथरूड भागात रस्त्यावर आला होता. यानंतर एकच धावपळ उडाली. गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न, रेस्क्यू ऑपरेशन मात्र शेवटी गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान यावेळी नागरिकांना महामार्ग आणि बावधन परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.