आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन:पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष घालणार : मुख्यमंत्री

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर, बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते. बातमी मिळवताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती स्थापन करण्यात येईल.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक कै. मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...