आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:पेट्रोल, डिझेल इंधन वापर बंद करून आता इथेनॉलवर भर देणार - नितीन गडकरी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या आयुष्यात मला पेट्रोल, डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करून त्याचा वापर बंद करावयाचा असून वाहनांकरिता इथेनॉल वापरण्यावर भर द्यावयाचा आहे. बजाज, टीव्हीएस कंपन्यांच्या प्रमुखांशी मी बाेलणे करून त्यांना इथेनॉलवर चालू शकतील अशा दुचाकी, रिक्षा निर्मिती करणारी वाहने उपलब्ध करून द्या असे सुचवले आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ अशा महागड्या कारही इथेनाॅलवर भविष्यात चालू शकतील असे तंत्रज्ञान विकसित केले तरच प्रदूषण कमी हाेऊन नागरिकांचा पेट्रोल भुर्दंड कमी हाेऊ शकेल. आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना इथेनाॅल निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देता येईल असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर या अडीच किलाेमीटर अंतराच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती नीलम गाेऱ्हे, खासदार गिरीष बापट, महापाैर मुरलीधर माेहाेळ, आमदार माधुरी मिसाळ, आ.भीमराव तापकीर यांच्यासह विविध पक्षांचे लाेकप्रतिनिधी उपस्थित हाेते.

गडकरी म्हणाले, पुणे ते बंगळुरू दरम्यान ४० हजार काेटींचा द्रुतगती महामार्ग फलटण मार्ग निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्या बाजूला ‘नवे पुणे’ वसविण्याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेऊन जागा पाहिली पाहिजे.सायरनचे जागी वाद्यांचे आवाज : गडकरी म्हणाले, सध्या जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढते आहे. गाड्यांच्या कर्णकर्कश हाॅर्नमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ हाेते. रुग्णवाहिकेचे सायरन हे भयंकर प्रकारे वाजत राहतात. मंत्र्यांना लाल दिवा असलेल्या गाडीचे सायरन व सलामी याची खूप आवड असते परंतु मी लाल दिवेच बंद केल्याने सायरन संपुष्टात आले. मात्र, इतर सायरनला, हाॅर्नला तबला, व्हयाेलिन अशा भारतीय वाद्यांचे आवाज देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे.

फ्लेक्स फंड निर्माण करा : आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या दाैऱ्या निमित्त भाजप नेत्यांनी कार्यक्रमस्थळी तसेच शहरात माेठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली. यावर नाराज हाेत खासदार गिरीष बापट भाषणात गडकरी व उपमुख्यमंत्री पवारांना म्हणाले, चांगले रस्ते, सुविधा निर्मिती करण्यासाठी आपण एक ‘फ्लेक्स फंड’ तयार केला पाहिजे. जे फ्लेक्स लावतात त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या नावाची वीट बांधकामाच्या ठिकाणी लावली तर आपणास पैशांची कमतरता पडणार नाही. यावर शिवसेना नेत्या नीलम गाेऱ्हे टाेमणा मारत म्हणाल्या, बापट साहेब तुम्ही फ्लेक्सचा सल्ला चांगला दिला परंतु तुमच्याच पक्षाचे फ्लेक्स शहरात जास्त आहेत. पहिला तुमच्याच खिशात हात घालावा लागेल.

भूसंपादनाबाबत धाेरण ठरविणार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहरात मेट्राे, उड्डाणपुलाची कामे वेगाने सुरू असून ती वेळेत पूर्ण हाेणे महत्त्वाचे आहे. रस्ते, मेट्राे, रिंगराेड अशा कामाकरिता भूसंपादन करावयाचे असेल तर महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त किंमत माेजली जाते. शहरांची लाेकसंख्या वाढत असताना हजाराे वाहने रस्त्यावर येत असल्याने रस्ते कितीही रुंद केले तरी ते अपुरे पडतात. जलदगतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बाेलणे करून एक धाेरण आखण्यात येत असून त्याबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल, दाेन्ही पालखी मार्गांच्या रस्त्यांचे भूसंपादन अंतिम टप्प्यात असून लवकरच सासवड येथे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...