आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • With The Help Of His Lover, The Wife Removes The Thorn Of The Husband Who Is An Obstacle In An Immoral Relationship; Later The Body Was Also Buried!

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा निर्घृण खून:अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने कृत्य; नंतर मृतदेहही पुरला

कराडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केला. त्यानंतर शेतात बुलडोजरने पंधरा फूट खोल खड्डा काढून पतीचा मृतदेह पुरला. गुरुवारी (ता. 3) सायंकाळी सातच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या घटनेने पोलिसही हादरले आहेत.

खड्डा खोदून मृतदेह काढला

बरकत खुदबुद्दीन पटेल (वय ३२, रा. वहागाव ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खड्डा खोदून तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा पंचनाम्याची कार्यवाही व गुन्हाही दाखल करण्यात आला.

आठ दिवसांपासून बेपत्ता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील बरकत पटेल बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी तळबीड पोलिसात दाखल झाली होती. पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू होता. त्या कालावधीत बरकतच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दोघांत झाला होता वाद

बरकतच्या पत्नीने अनैतिक संबंध असलेल्या तरुणासोबत पतीचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यांच्या अनैतिक संबंधाची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद घालत होता. संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकराने सुमारे आठ दिवसांपूर्वी बरकतचा खून केला.

असा पुरला मृतदेह

तत्पूर्वी संबंधित युवकाने शेतात भाडेतत्त्वावर बुलडोजर आणला होता. रानात पाण्याची टाकी करायची आहे, असे सांगून खड्डा खणला. त्या खड्ड्यात खुनानंतर बरकतचा मृतदेह पुरण्यात आला आहे. थोडीफार माती ओढून तो खड्डा बुजविला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबीने पाण्याची टाकी बांधण्याचे काम रद्द झाल्याने खणलेले खड्डा भरून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. रात्री उशिरा तहसीलदारांसमोर संबंधित खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...