आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा चालकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या:बाबा आढव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उबेर,ओला आणि रॅपिडो या खाजगी प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या कंपंनीची बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यासाठी ऑटो रिक्षा चालकाकडून 12 डिसेंबर रोजी पुणे आरटीओ समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर पोलिसांच्या व प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन मोडीत काढण्यात आले. याप्रकरणी ऑटो रिक्षा बंद संप दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी रिक्षा पंचायत समितीचे वतीने सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर रिक्षा चालकांनी काळया फिती लावून आंदोलन केले.

डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आढाव म्हणाले, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देवून रिक्षा चालक यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि जे बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा आहेत त्याची परवानगी रद्द करावी अशी आमची मागणी आहे असे सांगण्यात आले. त्याचबरोबर रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. रिक्षाचालकांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ पाठीमागे घ्यावेत अन्यथा परीक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी यावेळी दिला.

पुण्यातील सुमारे 16 ऑटो रिक्षा संघटनानी बेकायदेशीर बाईक टॅक्सी प्रवासी वाहतुकी विरोधात आंदोलन करत होत्या. त्यासाठी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर प्रथम 28 नोव्हेंबरला त्यांना प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले की, आम्ही कारवाई करू आणि बारा डिसेंबरपर्यंत रिक्षा संघटनाने वाट बघून पुन्हा पुणे आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन सुरू केले.त्यानंतर पोलिसांच्या व प्रशासनाच्या वतीने ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी कारवाई करण्यात आली होती आणि रिक्षा संघटना नेत्यांसह चालकांवर अशा एकूण ४० जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...