आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील वडारवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ओळखीच्या एका व्यक्तीस कामाकरिता वेळोवेळी पाच लाख रुपये हात उसने स्वरूपात दिले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने सदर पैसे परत न केल्याने महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
सुरेखा रामदास मते (वय -52 ,रा. वडारवाडी ,पुणे) असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे .याप्रकरणी आरोपी अनिल तुकाराम लोखंडे (रा. बिबेवाडी, पुणे )याच्यावर चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विरोधात साक्षी रामदास मते (वय- 19) हिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 16.2.2023 रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,साक्षी मते यांची आई सुरेखा मते यांनी त्यांच्या ओळखीचा आरोपी अनिल लोखंडे यास वेळोवेळी पाच लाख रुपये हात उसने म्हणून दिले होते. ते पैसे वेळोवेळी मागितले असता, आरोपीने ते त्यांना परत केले नाही. तसेच पैसे परत मागितल्यास पोलिसांकडे खोटी तक्रार करीन आणि त्यात अडकवेल अशी धमकी दिल्याने आरोपीच्या त्रासाला कंटाळून सुरेखा मते यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहे.
लग्नासाठी आत्महत्येची धमकी
आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश दशरथ गायकवाड( रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार जानेवारी ते मार्च 2023 यादरम्यान जंगली महाराज रोड येथील मॅक इन्स्टिट्यूट या ठिकाणी घडला आहे. आरोपी सोबत 2015 मध्ये मॅक इन्स्टिट्यूट येथे ॲनिमेशन क्लास करत असताना, तरुणीची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी सदरचे काम सोडून दिल्यानंतर, त्यानी तरुणीचा मोबाईल नंबर कुठून तरी शोधून काढून त्यावर कॉल करून' तू मला आवडतेस, तू माझी हो ,माझ्याशी लग्न कर ,तू माझी नाही झालीस तर मी आत्महत्या करेल' असा धमकीचा मेसेज करून तिच्या व्हाट्सअप मेसेजवर वारंवार मेसेज करून तिचा पाठलाग करत होता.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.