आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवेली तालुक्यातील कोलवडी गावठाण गावात राहणाऱ्या एका महिलेच्या शेजाऱ्याने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास दिल्याने संबंधित महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या घराशेजारील दांपत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
ज्ञानेश्वर लटके आणि शितल लटके (रा.कोलवडी, तालुका- हवेली ,पुणे) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून ज्ञानेश्वर लटके यास पोलिसांनी अटक केली आहे.
शाहीन आत्तार (वय - ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती शौकत महताब अत्तार (३९) यांनी संशयित आरोपी विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना ३१ मार्च रोजी घडला असून रुग्णालयात उपचार घेताना महिला मृत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शौकत अत्तार आणि ज्ञानेश्वर लटके हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. तक्रारदार यांची पत्नी शाहीन अत्तार यांना संशयितांनी घरी बोलावून घेऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला त्रास देत टोमणे मारले. संशयित आरोपीने महिलेस तू पुलाखाली भेटण्यास का आली नाही, तू मोबाईलवर कुणाला बोलतेस ते तुझ्या नवऱ्याला सगळे सांगतो अशी धमकी दिली. याचा मयत महिलेस मानसिक त्रास होऊन तिने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहे.
सासरच्या छळास कंटाळून महिलेने जाळून घेतले
सासरच्या छळास कंटाळून एका 24 वर्षे महिलेने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेऊन लाइटरने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सासरच्या लोकांनी मानसिक त्रास व शारीरिक त्रास दिल्याने, महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने महिलेचा पती, सासू-सासरे आणि चुलत सासरे अशा चार जणांच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.