आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपहरण प्रकरण:महिलेने गर्भपात लपवण्यासाठी दुसऱ्या मुलीचे केले अपहरण, पतीला म्हणाली - हे आपलेच अपत्य आहे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस नवजात बाळाच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

7 व्या महिन्यात एका महिलेचा गर्भपात झाला परंतु तिने ही गोष्ट आपल्या पतीपासून लपवून ठेवली. त्यानंतर त्या महिलेने सुमारे चार महिन्यांच्या नवजात मुलीचे अपहरण केले आणि आपल्या पतीसमोर तिला आपली मुलगी असल्याचे सांगितले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिस नवजात बाळाच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली महिला ही बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे राहणारी राणी शिवाजी यादव आहे. ते म्हणाले की राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, महिलेने चौकशी दरम्यान सांगितले की ती बीडची रहिवासी आहे. कामामुळे ती पुण्यात एकटी राहायची. ती गर्भवती होती. अचानक तिचा गर्भपात झाला. यानंतर तिने याविषयी आपल्या सासरच्यांना माहिती दिली नाही. मग ती घरी गेल्यावर बाळाविषयी काय सांगावे असा ती विचार करु लागली. नंतर तिने योजना आखली आणि ज्या घरात नवजात बाळ आहे त्या घरात काम शोधले.

दरम्यान, राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांनी पोलिसांना सांगितले होते की, राणी कामाच्या शोधात त्यांच्या घरी आली होती. काही दिवस काम केल्यावर राणी चार महिन्यांच्या धनश्रीला घेऊन पळून गेली. त्यानंतर त्यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई दरम्यान सुमारे 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी राणी पूर्वी जिथे राहत असे तेथे पोलिस पोहोचले असता ती बरेच दिवसांपासून येथे राहत नसल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्या महिलेला अंबेजोगाईतील कुथार विहार येथून अटक केली.

चार महिन्यांच्या धनश्रीची ही आहे कहाणी
धनश्रीच्या जन्माची एक विचित्र कथाही आहे. धनश्रीचा जन्म एका प्रेम प्रकरणात खासगी वसतिगृहात झाला होता. जन्मानंतर धनश्रीच्या आई आणि वडिलांनी मुलीला राजेंद्र नागपुरे आणि त्यांची पत्नी यांच्याकडे सोपवले आणि त्यांनी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. मूळ पालकांनी धनश्रीची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...