आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लाॅकडाऊन काळात केक, बिस्कीट, चाॅकलेट करण्यावर महिलांचा भर

पुणे2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • आज जागतिक चॉकलेट डे, माेरडे फूड्सचे माेरडे यांची माहिती

काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व व्यवहार ठप्प हाेऊन अर्थचक्र थांबले. परंतु या काळात घरात असलेल्या मुलांपासून मोठ्यांचा आंनद, उत्साह टिकवून ठेवण्यासाठी महिलांकडून घरगुती केक, बिस्कीट, चाॅकलेटची निर्मिती दुपटीने वाढल्याचे दिसून आले. काेकाे पावडर, चाॅकलेट यांना या काळात माेठी मागणी हाेती, अशी माहिती देशातील काेकाे व चाॅकलेट उत्पादनात अग्रगण्य असलेल्ये माेरडे फूड्सचे संचालक हर्षल माेरडे यांनी दिली आहे. 

माेरडे म्हणाले, लाॅकडाऊनचा ५० टक्के परिणाम व्यवसायावर झाला असला तरी इतर उद्याेगांपेक्षा चाॅकलेट, बिस्कीटची मागणी देशभरात चांगल्या प्रकारे हाेती. हाॅटेल, दुकाने, विक्रेते यांचा व्यवहार बंद असल्याने त्याचा परिणाम आमच्यावर झाला. मात्र, या काळात बिस्किटासाेबतच चाॅकलेट निर्मििती घराघरात मोठ्या प्रमाणात  झाली. चाॅकलेटचा घरगुती वापर कशा प्रकारे वाढला जाईल यादृष्टीने आम्ही विचार करून मोठ्या पॅकिंगएेवजी घरपाेच घरगुती छाेटे पॅकिंग यापुढील काळात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. चाॅकलेट डेनिमित्त विशेष कार्यक्रम ७ जुलै हा जागतिक चाॅकलेट डे असल्याने मारिया गाेरटी यांच्यासमवेत घरच्या घरी कशा प्रकारे चाॅकलेट तयार करावे याबाबतचा लाइव्ह शो इन्स्टाग्रामवर घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ यादरम्यान @mariagorettiz या इन्स्टाग्राम खात्यावर सदर कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. 

लाॅकडाऊनमध्ये चाॅकलेट बनवण्यास शिकले

संगणक अभियंता असलेल्या रितू गांगुली म्हणाल्या, कामाच्या निमित्ताने इतर वेळी घरात काही पदार्थ बनवणे शक्य हाेत नाही. परंतु लाॅकडाऊनमध्ये वर्क फ्राॅम हाेम असल्याने पुरेसा वेळ ही मिळत आहे. चाॅकलेट ही घरातील सर्वांची आवडती वस्तू. परंतु दुकाने बंद असल्याने चाॅकलेट मिळणे अवघड झाले हाेते. अखेर यूट्यूबवर चाॅकलेट कशा प्रकारे बनवतात याची रेसिपी पाहून त्यानुसार काेकाे पावडरच्या मदतीने घरातच प्रथम चाॅकलेट बनवण्यास शिकले. 

बातम्या आणखी आहेत...