आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पर्यावरण दिवस:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'तेर एन्हायराथाॅन 2022' स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'तेर पॉलिसी सेंटर' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने 'तेर एन्व्हायरॉथॉन 2022' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, युवा पर्यावरण दूत अवनी अवस्थी, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश गावसकर यांनी वेगवेगळ्या गटातल्या स्पर्धकांना झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. वय वर्षे ३ ते ७१ वर्ष वयोगटातील सातशेहून अनेक खेळाडू व सर्व सामान्य नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

'पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. त्या जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम असल्याने त्याला सहकार्य करायला आनंद वाटला',असे ग्रामीण पुणे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आणि अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे म्हणाले.

यावेळी विनया मालुसरे, मोनाली सिंघवी, प्रथमेश देशमुख, रणजीत खंबळकर, हेमंत कुमार, गणेश मोरे, राम जागडे, देवांग, डॉ संजीवनी कुलकर्णी, डॉ विनिता दीक्षित, नीलिमा कारंडे, मानसी यादव, शुभांगी पवार, जितेंद्र चव्हाण, कृष्णा कुऱ्हाडे, सूरज शेळके, किशन यादव, विनया मालुसरे, प्रतीक आव्हाळे, आदिती हरगुडे, अंजली पारा, डॉ प्राजक्ता, सुरेखा श्रीकांत, सुमीत चंद्रा, अनुप धोत्रे, विष्णु श्री या विविध गटातील विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

'ओन्ली वन अर्थ' असे या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य होते. तर ' रन फॉर एन्व्हायर्नमेंट ' हे या स्पर्धेचे घोषवाक्य होते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश या स्पर्धेतून दिला गेला.सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेवून पर्यावरण दिन साजरा केला. पर्यावरणाची स्थिती फारच गंभीर असली तरीही आपण सगळयांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले तर नक्कीच हवामान बदलाच्या या लढाईत विजयी होऊ, असा विश्वास वाटतो, असे तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष डॉ विनिता आपटे म्हणाल्या.

भारत हा जगातला पहिला देश आहे जिथे जंगल वाढते आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी स्वतःपासून सुुरुवात केली पाहिजे. जागतिक पातळीवरील काही अहवाल घाबरविणारे असले, तरी सामूहिक प्रयत्नातून पृथ्वी वाचविण्यात आपण यशस्वी होऊ. पर्यारण प्रेम वाढविण्यासाठी ही मॅराथॉन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्रकाश जावडेकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...