आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवर जात असलेल्या नागरिकास 2 गुंडानी लुटले:चाकूने वार करुन केले जखमी; 20 हजारांची रोख रक्कमसह मोबाईल लंपास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोटारसायकलवर जात असलेल्या नागरिकास अडवून दोन गुंडानी चाकूने वार करत त्याला लुटल्याचा प्रकार कोंढवा परिसारातील व्हीआयआयटी काॅलेजच्या समाेर घडला. तसेच त्याच्यावर वार करत त्याला जखमी केले. सदरील या प्रकरणाची माहिती पोलिसांनी बुधवारी (2 नोव्हेंबरला) दिली.

रमेश शंकर डाेणे (वय-42,रा.कात्रज-काेंढवा रस्ता,पुणे) यांनी याबाबत काेंढवा पोलिस ठाण्यात दाेन आराेपीं विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओमकार विष्णु रांजगे (वय-21,रा.कात्रज,पुणे) या सराईत गुन्हेगार आराेपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या एका साथीदारावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रमेश डाेणे हे माेटारसायकलवरुन काेंढवा परिसरातून त्यांच्या दुचाकीवर जात हाेते. त्यावेळी आराेपींनी त्यांच्या ताब्यातील माेटारसायकल डाेणे यांच्या दुचाकीस आठवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर आराेपी ओमकार रांजगे याने डाेणे यांचे उजव्या हाताचे अंगठयावर कशाने तरी वार करुन त्यांना जखमी केले. तर, त्याचा साथीदाराने तक्रारदार यांच्या पॅन्टच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. अशाचप्रकारे नागेंद्र मारुती माेरे (वय-28,रा.काेंढवा,पुणे) यांना ही आरोपींनी अडवून त्यांच्यावर चाकुने हातावर वार करुन त्यांना जखमी केले त्यानंतर त्यांचेकडील राेख 20 हजार रुपये आणि माेबाईल फाेन जबरदस्तीने काढून घेण्यात आला व आराेपी पसार झाले.

सदरील या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करुन आराेपींचा शाेध सुरु केला. त्यानुसार आराेपी ओमकार रांजगे यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस उसगावकर पुढील तपास करत आहे.

अ‍ॅप डाऊनलाेड करण्यास लावून 48 हजारांचा गंडा

तुमचे इलेक्ट्रीक बील भरण्याचे राहिले असून ते तातडीने भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन ताेडण्यात येईल असे सांगत, वीज बील भरण्याचे बहाण्याने क्वीक स्पाेर्ट नावाचे अ‍ॅप प्लेस्टाेअर्स मधुन डाऊनलाेड करण्यास एका ज्येष्ठ नागरिकास भामटयांनी लावले. त्यानंतर त्यात ओटीपी भरुन घेण्याचे बहाण्याने स्वत:ला इलेक्ट्रिसिटी अधिकारी म्हणून घेणाऱ्या भामटयाने त्यांची 48 हजार रुपयांची परस्पर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गजानन शामराव पाटील (वय-63,रा.चिंचवड,पुणे) यांनी अज्ञात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती पाेलीसांनी बुधवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...