आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू:पुण्यात दाेन डाॅक्टरांसह एका नर्सवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कणकणीच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार करण्यासाठी आलेल्या एका रुग्णावर चुकीचे उपचार केल्याने संबंधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची घटना सव्वावर्षापूर्वी घडली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी चाैकशी करुन दाेन डाॅक्टर व एका नर्सवर गुन्हा दाखल केल्याची माहिती गुरुवारी दिली.

डाॅ. खलीद सय्यद (वय 50, रा.बाेपाेडी, पुणे) व डाॅ. आयेशा सय्यद (46) आणि नर्स सुनिता गडपल्लु (48, सर्व रा.खडकी बाजार, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. याप्रकरणी कविता अतुल तुपसाैदर्यं (वय 25, रा.खडकी बाजार,पुणे) यांनी खडकी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 20 सप्टेंबर 2021 राेजी घडला.

अशी घडली घटना

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कविता तुपसाैदर्य यांचे पती अतुल तुपसाैदर्य यांना 20 सप्टेंबर 2021 राेजी कणकणीचा त्रास जाणवत हाेता. त्यामुळे ते घराजवळील खडकी बाजार येथील डाॅ. सय्यद हाॅस्पिटल याठिकाणी तपासणीसाठी गेले हाेते. उपचाराकरीता रुग्णालयात ते गेले असताना, संबंधित ठिकाणी डाॅ. खलीद सय्यद व डाॅ. आयेशा सय्यद यांनी उपचारात निष्काळजीपणा दाखवला.

हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न

नर्स सुनिता गडपल्लु यांनी अतुल यांना कमरेच्या उजव्या बाजुस इंजेक्शन दिले असता, तेथे इन्फेकशन हाेऊन गाठ आली. उपचारादरम्यान 24 सप्टेंबर राेजी ससून रुग्णालय येथे त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणाची तपासणी तज्ञ समितीने करुन डाॅक्टरांचा हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत दाेषींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास खडकी पाेलिस करत आहे.

माेक्कातील आराेपी पसार

पिस्तुलचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटून नेणाऱ्या टाेळीतील आराेपी संताेष बाळु पवार (वय 23, रा.पानशेत,ता.हवेली, पुणे) असे आराेप यास पाेलिसांनी तपासासाठी नेले असता ताे पाेलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याची घटना घडली. अविनाश गुप्ता टाेळीतील ताे आराेपी असून सदर टाेळीवर अवैध मार्गाने धमकी देऊन जुलुस जबरदस्ती करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहे. संबंधित टाेळीवर पाेलिसांनी माेक्का कारवाई केली. पाेलिस तपास करत असताना बुधवारी रात्री ताे पाेलिसांची नजर चुकवून पळून गेला.

बातम्या आणखी आहेत...