आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Crime, Pune News, Pune Update, Pune Boy Hang, An 8 year old Boy Hanged Himself After Hanging A Doll In Pune; Extreme Steps Taken After Watching The Horror Video

मोबाइल बेतला जीवावर:आधी बाहुलीला दिली फाशी, नंतर 8 वर्षांच्या मुलाने घेतला गळफास; हॉरर चित्रफीत पाहून टोकाचे पाऊल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाहुलीला फाशी देऊन अवघ्या 8 वर्षांच्या मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मोबाइलवर हॉरर चित्रफीत पाहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. कमल खेम साऊद (रा. सोळानंबर बस स्टॉप, थेरगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

कशी घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणी देखील खेळत होती. त्यावेळी कमलची आई कामात व्यस्त होती. तर, वडील बाहेर गेले होते. दरम्यान, खेळत असताना कमलने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमलने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला.

हॉरर सिन पाहून कृत्य?

काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाइलवर हॉरर चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे हॉरर फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगतले जात आहे.याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

अशी थट्टा करून नको...

कमल दोन्ही मुलांपेक्षा वयाने मोठा आणि हुशार होता. आई कामात असताना तोच लहान भावंडाना सांभाळत होता. रविवारी दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, पोटाचा गोळा फासावर लटकलेले भीतीदायक चित्र नजरेस पडले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...