आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार:आईला कापून टाकण्याची धमकी देत वारंवार बलात्कार; कुंजीरवाडीत नात्याला काळीमा

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातल्या कुंजीरवाडीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, नात्यातील पाच वर्षीय चिमुरडीवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात 24 जुलै रोजी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाच्या घरी त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला सोडले होते. तर, संशयित आरोपी तरुण त्यांच्या घरी येत जात होता. याचवेळी त्याने संधी साधून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले.

घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आईला कापून टाकील, अशी धमकीही दिली होती. चिमुरडीच्या पोटात त्रास होऊ लागल्याने तिने आईला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फातिमाननगर परिसरातील के.पी.सी.टी. मॉलमध्ये कुटूंबासोबत कपडे खरेदीला गेलेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा येथील एकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी अब्दुल बाबू शेख (वय ३५) याला अटक केली आहे, अशी माहिती सोमवारी दिली आहे. याबाबत पीडित मुलीच्या ४४ वर्षीय आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपींवर विनयभंग व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमानगर परिसरात के.पी.सी.टी. मॉल आहे. या मॉलमध्ये सहा ते सात दुकाने आहेत. त्यातील एका दुकानात हे कुटूंब कपडे खरेदीसाठी गेले होते. त्यांची मुलगी देखील सोबत होती. कपडे खरेदी करत असताना येथील अब्दुल शेखने या मुलीशी अश्लील चाळेकरून तिचा विनयभंग केला. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी अब्दुलला अटक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...