आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर जगभरात होणार आहे. ‘आशय सांस्कृतिक’तर्फे ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारा ‘पुलोत्सव’ आता ‘ग्लोबल पुलोत्सव’ होणार आहे. येत्या वर्षभर हा महोत्सव साजरा होणार असून याअंतर्गत देशातील २३ शहरांसह पाच खंडांतील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रम रंगणार आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी ‘पुलं’च्या जन्मदिनानिमित्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याप्रसंगी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सहसंयोजक सुवर्णा भांबुरकर आणि नयनीश देशपांडे उपस्थित होते. ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘ग्लोबल पुलोत्सव’ जगभरात साजरा होणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर या शहरांसह देशातील इंदाैर, बडोदा, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद आदी शहरांमध्ये महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच, जगभरातील लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरन्टो, जोहान्सबर्ग, सिडनी, ऑकलंड आदी शहरांमध्येही महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक शहरात मान्यवरांची ‘सल्लागार समिती’ तर पु. ल. प्रेमी आणि संस्थांची ‘कार्य समिती’ तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती चित्राव यांनी दिली.
महोत्सवाची वैशिष्ट्ये { विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी { सुमारे एक हजार कलाकार व साहित्यिकांचा सहभाग { प्रत्येक शहरातील पुलोत्सवात ‘स्मृती सन्मान’, ‘जीवनगौरव सन्मान’, ‘कृतज्ञता सन्मान’ व ‘तरुणाई सन्मान’ होणार प्रदान { महोत्सवाच्या निमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक आणि लघुपटाची निर्मिती { महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पुलंच्या साहित्यावर ’धारलेल्या अर्कचित्रांचे प्रदर्शन { ‘आय लव्ह पी. एल.’ या शीर्षकाखाली शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष मोहीम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.