आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा पुन्हा गजबजल्या:पुण्यात सनई चौघडे वाजवत विद्यार्थ्यांचे स्वागत; विविध पक्ष, संघटनांकडून मुलांना खाऊ

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या संकटानंतर आज 2 वर्षानंतर शाळा पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने विविध पक्ष, संघटनांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत सुरू केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर कसबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ येथे खाऊ देऊन आज सकाळी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत सर्व विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील यावेळी उपस्थित होते.

भावे प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे सनई चौघडे, फुग्यांची कमान, तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे. तर, भारतीय जनता पक्ष, पुणे शहर यांच्या वतीने शनिवार पेठेतील रानडे बालक मंदिर येथे फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.
खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...