आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिवस:21 जून रोजी एमटीडीसीचे ग्राहक करणार योगसाधना; पर्यटक निवासाच्या ठिकाणी सांगणार योगाचे महत्त्व

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून यंदा राज्यभरातील पर्यटक निवासाच्या ठिकाणी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. विशेषतः राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासाच्या ठिकाणी योगसाधना करून 21 जून रोजी 'योग दिवस' साजरा केला जाणार आहे. यावर्षीच्या जागतिक योगा दिनाची थीम मानवतेसाठी आहे.

काय होणार कार्यक्रम?

एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले की, योगाचा प्रचार व प्रसार वाढवून योगमय वातावरण निर्माण व्हावे तसेच योगा दिनाची जागृती करून आरोग्य सुद्दढ कसे राखता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये जागतिक योगा दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

व्याखानाचेही आयोजन

पर्यटक निवासाच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलवून पर्यटकांना योगाचे जीवनामधील महत्त्व, योगाचे प्रकार, योग केल्याचे शरीरास त्याचा होणारा फायदा तसेच आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात मनाच्या एकाग्रतेसाठी योगा किती गरजेचा आहे हे व्याख्यानाव्दारे सांगितले जाणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनांना त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा प्रयत्न आरोग्य सुधारण्याकरता प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन केले जाणार आहे.

मानवतेसाठी योगा

एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज म्हणाल्या, 2022 या वर्षाची संकल्पना मानवतेसाठी योगा अशी आहे. योगा माणसांना आपसात जोडून परस्पर प्रेम आणि सध्दावतेची भावना विकसित करतो. त्यामुळे महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध धर्मांचे लोक जाती, पंथ आणि देशप्रेमाच्या भावनेने प्रेम, सद्भावना आणि आत्मीयतेने योगा करण्यास मार्गदर्शन करण्यात येईल. त्या अनुषंगाने महामंडळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये जागतिक योगा दिन साजरा करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...