आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Young Leaders In The Jain Community Are Also At The Forefront Of The Administrative Service, Piercing The Image Of The Merchant | Marathi News

पुण्यात जितो कनेक्ट:व्यापारी प्रतिमेला छेद देत जैन समाजातील तरुण प्रशासकीय सेवेतही आघाडीवर; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे गौरवोद्गार

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन म्हणजे व्यापार अशी या समाजाची प्रतिमा आहे. कारण जन्मापासूनच त्यांना व्यापाराचे धडे मिळतात. मात्र नवी पिढी या प्रतिमेला छेद देत सनदी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत येत असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी काढले.

‘जितो कनेक्ट २०२२’ अंतर्गत आयोजित प्राइड ऑफ पुणे पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा उद्योजक विजय भंडारी यांना प्राइड ऑफ पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंग जेम ऑफ जितो पुरस्काराने क्रीडापटू प्रियम तातेड, सामाजिक बांधिलकी पुरस्काराने सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, सामाजिक कार्यासाठी विमल बाफना, उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने पिनॅकल उद्योग समूहाचे डॉ. सुधीर मेहता आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या संजय चोरडिया यांना गौरवण्यात आले. युवा उद्योजक पुरस्कार अतुल चोरडिया यांना देण्यात आला. पवार यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच जितो पुस्तिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले.

पवार म्हणाले, संकटात जैन समाज नेहमी पुढे असतो. कोविड काळात त्यांनी केलेले कार्य समाज कधीही विसरू शकणार नाही. पूर्वी देशातील श्रीमंतांच्या यादीत टाटा आणि बिर्ला यांचे नाव यायचे. आता जैन समाजातील गौतम अदानी यांनी हे स्थान पटकावले आहे. जैन समाज म्हणजे व्यापार असेच समीकरण आहे. कारण त्यांच्या भावी पिढीला लहानपणापासून व्यापाराचे शिक्षण मिळते. मात्र, नवी पिढी आयएएस आणि आयपीएस होत सनदी अधिकारी म्हणून नाव काढत आहे.

बातम्या आणखी आहेत...