आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी जेरबंद:व्याजाने घेतलेले पैसे परत करत नसल्याने तरुणाचे अपहरण; पोलिसांनी अवघ्या 4 तासांत केली सुटका

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजाने घेतलेले पैसे परत करत नसल्याच्या कारणामुळे अपहरण केलेल्या तरुणाची चिखली पोलिसांनी अवघ्या 4 तासांत सुटका केली. एवढेच नाही तर अपहरण करून खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 3 आरोपींनाही पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती शुक्रवारी दिली.

चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुर्णानगर येथे गुरुवारी (16 जून) दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी अपहरण झालेल्या तरुणाच्या वडीलांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत गौतम नवनाथ सोनवणे, मयूर रामपूरे, अब्दुल चौधरी यांना अटक केली आहे.

चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे आणि विवके कुमटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 25 वर्षीय मुलगा आहे. त्याने आरोपी गौतम यांच्याकडून व्याजाने 50 हजार रुपये घतले होते. मात्र, त्याने ते परत केले नसल्याचे गौतमचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता हा तरुण आपल्या मावस भावाबरोबर रस्त्याने पायी चालत येत होता. तेव्हा एका चंदेरी रंगाच्या चारचाकी वाहनात आरोपींनी तरुणाला बळजबरीने टाकून नेले. ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजता पुर्णानगर चिखली येथे घडली.

तरुणाची सुखरूप सुटका

तरुणाचे अपहरण केल्यानंतर गौतम नावाच्या आरोपीने तरुणाच्या वडीलांना फोन केला. तुम्ही जर एका तासात 1 लाख 40 हजार रुपये घेऊन अजंठानगर येथे आला नाही, तर तुमच्या मुलाचे तुकडे करेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलिस धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत लगेचच तपासाची सुत्रे हलविली. संबंधित मोबाईलचे लोकेशन शोधून आरोपींच्या मागावर पोलिसांची दोन पथके पाठवित आरोपींनी जेरबंद करत तरुणाची सुखरुप सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...