आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगणक अभियंता तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली.अजिंक्य रमेश सावंत (वय 26, रा. मेघवाडी, लालबाग, लोअर परळ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संगणक अभियंता तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबात संगणक अभियंता तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणी खराडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. तिघींनी मुंढव्यातील केशवनगर परिसरातील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्वावर घेतली आहे. आरोपी अजिंक्य सावंतचे तक्रारदार तरुणीच्या एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत.
अजिंक्य मैत्रिणीला भेटायला मुंबईहून पुण्यात आला होता. तक्रारदार तरुणी सकाळी गाढ झोपेत होती. त्या वेळी अजिंक्यने तरुणीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला जाग आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. अजिंक्यच्या मैत्रिणीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने मैत्रीणाला मारहाण केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. आरोपी अजिंक्य याला अटक करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक एस गाडे पुढील तपास करत आहेत.
पाठलाग करत मारला डोळा
आईबरोबर दुचाकीवर जाणार्या तरूणीच्या आईने सिग्नलला दुचाकी थांबविल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तिघांपैकीमध्ये बसलेल्या एकाने डोळा मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान सिग्नल सुटल्याने तरूणीच्या आईने गाडी सुरू केल्यानंतर आरोपीने पुन्हा तरूणीला फ्लाईंग किस दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधीत दुचाकीवरील तरूणावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका 29 वर्षीय तरूणीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यापूर्वी डोळा मारल्याच्या व फ्लाईंग किस दिल्याच्या कारणातून तिने आप एैसे गंदे क्यु करते हो म्हटल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.