आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:मध्यरात्री घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणाला अटक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंजवडी येथे बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घरात शिरुन १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीवे ठार मारण्याची धमकी देत आरोपीने मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी किरण दगडे (वय ३०) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे.

जीवे मारण्याची धमकी

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित मुलगी घरात झोपलेली असताना मध्यरात्री अचानक आराेपी किरण दगडे मुलीच्या खोलीत शिरला. तोंड दाबून त्याने मुलीला ओरडल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. सकाळी आईला हा प्रकार समजताच आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली.

पोस्को, बलात्काराचा गुन्हा

सहाय्यक पाेलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, आराेपीवर पाेस्काे व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी हा मुलीच्या घराजवळ राहणारा नाही. ताे अचानक परिसरात आला व घरात शिरुन त्याने बलात्कार केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...