आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण:तीन वर्षांच्या मुलीसमोरच तरुणाने पत्नीला ठार केले, दारू प्यायल्याचा जाब विचारल्याचा राग

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिऊन येत असल्याचा जाब विचारल्याने एका उच्चशिक्षित तरुणाने तीन वर्षाच्या चिमुरडीसमोर पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली. हत्येनंतर त्याने या खुनाची माहिती स्वत: पोलिस कंट्रोलला फोन करत दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

शिवम पंकज पचौरी ऊर्फ भारद्वाज (३२) असे आरोपीचे नाव आहे, तर अवंतिका शर्मा (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दोघांनाही तीन वर्षांची मुलगी असून तिच्यासमोरच शिवमने अवंतिकाची गळा दाबून हत्या केली. शिवम हा आयटी कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी शिवम याची नोकरी गेल्याने तो बेरोजगार झाला होता. त्यामुळे त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. शिवम दररोज मद्यपान करून अवंतिकाला मारहाण करायचा. दोन दिवसांपूर्वी शिवम मद्यपान करून घरी आला होता. त्यानंतर त्याचा अवंतिकासोबत वाद झाला. वाद इतका टोकाला गेल्यानंतर शिवमने अवंतिकाचे डोके आधी भिंतीवर आपटले. खाली पडल्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या करताना त्याची तीन वर्षांची चिमुरडी रडत होती.

बातम्या आणखी आहेत...