आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवक लघुशंकेसाठी थांबला असताना भामट्यांनी मी पोलिस असल्याने सांगून त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ऐवढंच नाही तर, जबरदस्तीने फोन पे खात्यावर 15 हजार हस्तांतरित करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अमोल भीमराव खंदारे (वय-23,रा.शिवाजीनगर,पुणे) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी इरफान सय्यद व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान घडलेला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. घटनेच्या दिवशी तक्रारदार अमोल खंदारे हा एकटाच कामावरुन घरी पायी जात होता. त्यावेळी शनिवार वाडयाचे समोरील नदी पात्रातील रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ तो लघुशंकेसाठी थांबला. लघूशंका करुन तो बाहेर फोनवर बोलण्यासाठी थांबलेला असताना आरोपीने शौचालयामधून बाहेर येवुन पकडले. त्याचेकडील ओळखपत्र दाखवत आरोपीने तो पोलिस असल्याचे सांगून त्यास मारहाण केली. याबाबत शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करत आहे.
जबरदस्तीने गुगल-पे वर पैसे घेत फसवणूक
शेवाळेवाडी परिसरात राहणारे सिताराम सदाशिव मुल्लया (वय-37) हे 15 नंबर चौक सोलापूर रस्ता, हडपसर येथून मोटारसायकलवर घरी जात असताना, त्यांना पाठीमागुन येणाऱ्या अनोळखी एक इसम आणि महिलेने त्यांचे मोटारसायकलचे पुढे त्यांची गाडी लावुन अडवले. मुल्लया यांचा मोटारसायकलवर बसलेल्या महिलेला धक्का लागला असल्याचे सांगत, तिने माझा भाऊ खूप डेंजर असल्याचे सांगत शेवाळे यांना भिती दाखवली. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत आरोपींनी त्यांचे फोन पे व गुगल पे वरुन जबरदस्तीने 20 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. याबाबत हडपसर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.