आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या बहिणीवर जडला जीव:सोबत रहा नाही, तर मारून टाकेल म्हणत तरुणाकडून प्रेयसीच्या बहिणीला धमकी, गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील हडपसर भागात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने प्रियसीच्या बहीणीस ही त्याच्या साेबत राहण्यास बाेलवले. मात्र, प्रियसीच्या बहिणीने त्यास नकार दिल्याने सदर प्रियकराने रागाच्या भरात प्रियसीच्या बहिणीचा विनयभंग करत तिच्या अंगावर तलावर उगारून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात 30 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर, साेहेल जावेद शेख (रा. हडपसर, पुणे) या आराेपीविराेधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार आठ सप्टेंबर राेजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हडपसर परितरातील एका साेसायटीत घडला आहे.

तक्रारदार विवाहित महिला व आराेपी साेहेल शेख हे दाेघे एकमेकांच्या ओळखीचे आहे. तक्रारदार महिलेची 24 वर्षीय बहीण आराेपी साेबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मागील काही दिवसांपासून राहत आहे. मात्र, सदर ओळखीतून आराेपी तक्रारदार महिलेच्या पाठीमागे लागून तिला ही त्याच्यासाेबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यास बाेलवत हाेता आणि ‘तू माझ्या साेबत येशील का? मी तुला सांभाळताे’ असे सातत्याने म्हणत हाेता. परंतु पीडित महिला त्यास नकार देत असल्याने तिच्यावर आराेपी चिडून हाेता व तिच्या बहिणीसाेबत सातत्याने भांडणे करू लागला हाेता. सदर दाेघातील भांडणे साेडविण्यासाठी पीडित महिला त्याठिकाणी आली असता, आराेपीने तिची गळा धरून तिचा विनयभंग करत. तिला अश्लील बाेलून स्वत: विवस्त्र हाेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे वर्तन केले. याप्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आराेपीने पुन्हा कपडे घातले आणि घरात ठेवलेली तलावर घेऊन आला. त्याने सदर तलावारीने तिच्या गळयातील मंगळसूत्र ताेडून नुकसान केले व तिच्या अंगावर तलावर उगारुन तिला सोबत राली नाहीस, तर मी तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली.

याप्रकाराने भेदरलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने आराेपी साेहेल शेख हातातील तलवार त्याचठिकाणी टाकून पळून गेला. त्यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनरीक्षक एस. पाटील करत आहे.

बातम्या आणखी आहेत...