आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजना देश हिताचीच आहे. त्यामुळे तरुण देशसेवेकडे प्रेरित होतील, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (नि) राजेंद्र निंभोरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. अग्निपथ योजना नक्की काय आहे या विषयावर भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यलयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
भरतीत हस्तक्षेप नाही
निंभोरकर म्हणाले की, सैन्यभरतीच्या प्रक्रियेत कुठेही हस्तक्षेप या योजनेमध्ये होणार नाही. केंद्र सरकार ने वयोमर्यादा 17.5 ते 23 अशी केली आहे. ज्यामध्ये 4 वर्ष लष्कर सेवा केल्यानंतर 25 %उमेदवार निवडले जातील. उरलेले जे उमेदवार केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात किंवा अन्य सेवेत त्यांना प्राधान्य असेल. राज्य सरकारांनी सुद्धा या अग्निवीरांसाठी पोलिस भरती किंवा इतर क्षेत्रामध्ये आरक्षण जाहीर केले तर ते जास्त उपायुक्त ठरेल.
उज्वल भविष्याची संधी
यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले, की गोपनीयता ही तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. प्रत्येक क्षेत्रात गोपनीयता असतेच मग कोणीही नोकरीत बदल केला. तर आधीच्या ठिकाणची गोपनीयता भंग करत नाही. तर लष्करी सेवेवर आक्षेप घेतला जाऊ नये. या योजनेमुळे तरुणांना उज्वल भविष्याची संधी मिळेल. यावेळी त्यांनी या योजनेची विस्तृत माहिती दिली. शहर सरचिटणीस राजेश येनपुरे ,नारायण विश्वास, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.