आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात विवाहितेची आत्महत्या:2 वर्षांपूर्वीच केला होता आंतरजातीय प्रेम विवाह; आत्महत्याचे कारण अस्पष्ट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खडकवासला भागात घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. हवेली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.प्रांजल किसन रासकर (वय22, सध्या रा. खडकवासला, मूळ रा. पिंपळनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.

कुटुंबीयांच्या विरोध डावलून प्रांजलने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाहकेला होता. प्रांजलचा पती रात्री उशीरा कामावरुन घरी आला. पतीने घराचा दरवाजा वाजविला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्याने घरमालकाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रांजलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रांजलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे आढळून आले.तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. हवेली पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्मात आली आहे. प्रांजलच्या नातेवाईकांच्या जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हैद्राबादमधील गांजा राज्यात विक्रीस सीमाशुल्क विभागाची कारवाई; 56 किलो गांजा

हैद्राबादमधील परिवहन महामंडळाच्या बसमधून गांजा घेऊन येणाऱ्या तिघांना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ किलो गांजा जप्त करण्यात आला.

हैद्राबादमधील गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती कस्टमच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. हैद्राबादमधील परिवहन महामंडळाच्या बसमधून गांजा सोलापूर परिसरात पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टमचे अमली पदार्थ विरोधी पथक तेथे रवाना झाले. कस्टमच्या पथकाने बसचा पाठलाग केला. बस अडविण्यात आली. बसची तपासणी करण्यात आली. तेव्हा बसमध्ये पोत्यात ठेवण्यात आलेला 56 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टमच्या पुणे विभाग कार्यालयाचे उपायुक्त सचिन घागरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...