आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अपहरण करत तरुणाचा गुंडाकडून खून:बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने केली हत्या; दोघांना अटक

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे अशी माहिती मंगळवारी दिली आहे.

विशाल अमराळे (वय 35) आणि लहु माने (वय 40, दोघे रा.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. तर निखील ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, रा. आंबेगाव बुद्रुक,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याबाबत आरोपी विरोधात मयताची पत्नी हर्षदा निखील अनभुले (वय 24, रा. आंबेगाव बुद्रुक,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे दिली आहे. ही घटना फ्लाइंग बर्ड स्कुल आंबेगाव ते बिबवेवाडीतील के के मार्केट दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा ते १६ नोव्हेंबर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील अनभुले यांनी विशाल अमराळे याच्याकडून बेटिंगसाठी 28 हजार रुपये घेतले होते. ते परत देण्यासाठी अमराळे याने त्यांना वारंवार फोन करुन धमकाविले होते.यावेळी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून आरोपीने धमक्याही दिल्या होत्या. तरीही निखील याने पैसे परत केले नव्हते. त्यामुळे अखेर 15 नोव्हेंबर रोजी आरोपींनी निखील याला आंबेगाव येथील फ्लाइंग बर्ड स्कुल येथे बोलावून घेतले.तेथून अमराळे व त्याच्या साथीदाराने त्याचे अपहरण करुन त्याला के के मार्केट येथे आणून कोंडून ठेवले.त्याच्या पाठीवर, छातीवर कशाने तरी जबर मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले.

त्यात निखील याचा मृत्यू झाला.याबाबत सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मयतची नोंद केली होती आणि चौकशी सुरू केली होती. दरम्यान, निखील याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला.

त्यात मारहाण केल्याने मृत्यु झाल्याचे नमूद केले असल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन चौकशी अंती दोघां सराईत आरोपींना अटक केली आहे अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...