आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत युवा खेळाडू सरस:तेजस्विनी, पुष्कराजचा सुवर्णवेध; भाग्यश्री, नंदिनी, विश्रांती चॅम्पियन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या युवा नेमबाज पुष्कराज इंगोलेने मंगळवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. हे दाेघेही पहिल्याच दिवशी ५० मीटर रायफल प्राेन प्रकारात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यापाठाेपाठ श्रीगाेंदा येथील राष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड, काेल्हापूरची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नंदिनी, विश्रांती पाटीलने महिला कुस्तीचा आखाडा गाजवत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनीने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये ६१८ गुणांची कमाई करताना सुवर्णपदक आपल्या नावे केले. याच गटात मुंबईची भक्ती खामकर राैप्यपदक विजेती ठरली. तिचा ४.५ गुणांच्या फरकाने पराभव झाला. पुण्याच्या प्रणाली सूर्यवंशीने एकूण ६११.७ कांस्यपदक मिळवले. ितची यादरम्यानची कामगिरी लक्षवेधी ठरली.

तसेच तीन वेळा ऑलिंपियन अंजली भागवतने केवळ ६०३.८ गुण मिळवत सहाव्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या ५० मीटर प्रोन गटात पुष्कराजने एकूण ६२१. ७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या इंद्रजित मोहितने एकूण ६१८ गुणांसह रौप्यपदक तर पुण्याच्या अभिजितसिंह यांनी एकूण ६१२ .९ गुणांसह कांस्यपदक पटकावले. वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन नंदिनी साळोखे हिने सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात तिची प्रशिक्षण साथीदार नेहा चौघुले हिला पराभूत करून जिल्ह्याच्या सुवर्णपदकाची सुरुवात केली.

५५ किलो वजनी गटाच्या अंतिम राउंडमध्ये विश्रांती पाटीलने सांगलीच्या अंजली पाटीलवर वर्चस्व राखून कोल्हापूरसाठी दूसरे सुवर्णपदक मिळवले. कोल्हापूर शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमृत पुजारीने त्यांनंतर जिल्ह्यातील सृष्टी भोसलेचा पराभव करत ६५ किलो वजनी सुवर्णपदक जिंकले.

अहमदनगरच्या भाग्यश्री फडने ५९ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या अंकिता शिंदेचा पराभव करून कोल्हापूरचे वर्चस्व मोडीत काडले. तर साताऱ्याच्या वेदांतिका पवारने कोल्हापूरच्या सायली दंडवतवर सहज विजय मिळवत दिवसाचा खेळ पूर्ण केला. संध्याकाळनंतर पुरुषांच्या अंतिम फेरीला सुरुवात होईल. लेखनाच्या वेळी, योगासन (नाशिक ) आणि सॉफ्टबॉल (जळगाव ) मध्ये ही स्पर्धा सुरुवातीच्या टप्प्यावर होत्या.

बातम्या आणखी आहेत...