आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी नोकरीचं आमीष:कॅनडात नोकरीच्या लावण्याच्या आमिषाने 35 लाखांची फसवणूक; बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेकरी डाॅट काॅमवर मुलाचे नाेकरीसाठी अर्ज भरुन दिल्यानंतर अज्ञात माेबाईल धारकांनी पुण्यातील एका 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास फाेन करुन, मुलास कॅनडात चांगल्या पगाराची नाेकरी लावून देताे, असे अमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत तब्बल 35 लाख 53 हजार रुपये घेवून आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार निष्पन्न झाला आहे.

याबाबत बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात मरिमुथु सुप्पय्या (वय-74,रा.बिबवेवाडी,पुणे) यांनी अज्ञात चार माेबाईल क्रमांक धारकांविराेधात तक्रार दाखल केली आहे. मरिमुथु सुप्पय्या यांनी एप्रिल २०२१ मध्ये नाेकरी डाॅटकाॅमवर मुलासाठी नाेकरी शाेधत असताना त्याचा बायाेडाटा अर्ज भरुन ठेवला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे माेबाईल क्रमांकावर अनाेळखी माेबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फाेन येऊन त्याने तुमचा मुलगा अरुण जेमीन यास कॅनडात नाेकरी लावून देताे, असे सांगितले.

त्याकरिता वेगवेगळया प्रसाेसिंग फी च्या नावाखाली विविध बँक खात्यावर वेळाेवेळी 35 लाख 53 हजार रुपये ऑनलाईन भरण्यास लावले. मात्र, प्रत्यक्षात त्यास नाेकरी न देता त्याची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार यांना फसवणुक झाल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. सायबर पाेलिसांनी चाैकशी केल्यानंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पाेलीस उपआयुक्त यांचे लेखी आदेशान्वये सदर गुन्हा बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...