आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका तरुणाचे तीन लग्न झाले. मात्र, तिन्ही बायका न नांदल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुण हा दीड महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत येथील एका जंगलात सापडला.
शेखर शांताराम पवार (वय 28, रा. वाफगाव मांदळेवाडी, ता. खेड,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शांताराम गेणू पवार यांनी पारगाव पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. शेखर याची तीन लग्न झाली होती. मात्र, त्याच्या तीनही बायका त्याला सोडून गेल्या. तिन्ही पत्नी सोडून गेल्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्याच्या मेंदूवर परिणाम झाला होता. यातून त्याने या पूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
दीड महिन्यापूर्वी तो दोरी घेऊन घराबाहेर पडला होता. तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, 29 नोव्हेंबरला पहाडदरा गावच्या हद्दीत जंगलात गळफास घेतल्याचा सांगाडा सापडल्याचे पोलिस पाटील माऊली कराळे यांनी शांताराम पवार यांना कळवले. पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतव्यक्तीच्या कपड्यात सापडलेल्या कागदपत्रामुळे हा व्यक्ती शेखर पवार असल्याची खात्री पटली.
पुण्यात आणखी एक फसवणूक
पुण्यात मुंढवा येथे एकाने पाच लाख रुपये टोकन रक्कम देऊन उर्वरित रक्कम न देता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. केवळ पाच लाख रुपये देऊन त्यांनी उर्वरित रक्कम न देता ही फसवणूक केली आहे.
नितील हरी वाटवे (रा. नांदेड सिटी,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे सिक्युरिटी ऑफिसर आहेत. ते ज्यांच्या कडे काम करतात त्यांना 35 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांची बीएमडब्लु ही कार विकून पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार नितीन वाटवे याने त्यांची कार घेण्यास उत्सुकता दाखवली. त्यानुसर वाटवे यांनी कार घेण्यासाठी 5 लाख रुपये टोकन म्हणून दिले.
यानंतर उर्वरित रक्कम देतो असे सांगून त्यांची कार वाटवे हा घेऊन गेला. यानंतर इंगळे यांनी उर्वरित पैसे देण्यास वाटवे याच्या कडे वारंवार मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तब्बल दोन वर्षांपासूण त्याने पैसे न दिल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.