आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:युवक काँग्रेस घालणार विधिमंडळाला घेराव, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मितेंद्र सिंग म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन स्वराज्याची चेतना वेगळ्या स्वरूपात प्रत्येक युवकाच्या मनात जागवणे हे युवक काँग्रेसचे ध्येय आहे. युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होतील. भारताच्या तरुणांना प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सीमित करण्याच्या मोदी-अदानी युतीच्या षड‌्यंत्राला जाब विचारण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...