आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्या मध्यरात्री पुण्यात तरुणाचा खून:वारजे भागातील घटना; चाैघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या मध्यरात्री वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. वारजे पोलिसांनी तातडीने तपास करुन चार संशयितांना अटक केली अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

भूमीपूत्र युवराज कांबळे (वय २३, रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कांबळे याचा भाऊ वीरफकीरा याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि त्याचा मित्र मध्यरात्री वारजे भागातील विठ्ठलनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी चिक्या उर्फ ओंकार जगताप आणि साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. कांबळे याच्या डोक्यात दगड मारला. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली.

कांबळे याच्या मित्राने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वारजे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कांबळे याच्या खून प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तपास करत आहेत.

कसबा पेठेत दोघांवर कोयत्याने वार

किरकोळ कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना ३१ डिसेंबरला कसबा पेठेत घडली असून आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यश पिंगळे आणि केदार कुंभार (वय १८ रा. कसबा पेठ,पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी केदारने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार आणि यश ३१ डिसेंबरला अगरवाल सोसायटीपरिसरात मोबाइलवर गेम खेळत बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्याने केदारसोबत विनाकरण भांडणे केली. तु रोहितचा मित्र आहेस ना, तुला आज खल्लास करतो असे म्हणत त्याला कोयता फेकून मारून जखमी केले.

त्याचवेळी परिसरातून रोहित दरेकर चालला होता. त्यावेळी टोळक्याने त्याचा पाठलाग करून आज तुझा मर्डरच करतो असे म्हणत कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...