आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:उसने पैसे परत मागितल्याने तरुणीला गॅलरीतून फेकले; 26 वर्षीय तरुणाला अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील घटना, तरुणीचा पाय, मणका आणि खुबा फ्रॅक्चर

हातउसने दिलेले पैसे वेळेत परत न केल्याच्या कारणावरून एका तरुणीला पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली फेकल्याचा धक्कादायक घटना हडपसर येथे घडली. याप्रकरणी एकास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत फिर्यादीचा पाय, मणका आणि खुबा फ्रॅक्चर झाला आहे.

याबाबत २६ वर्षीय एका तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर भीमराव तुपे (३१, रा. सतरानळी, हडपसर,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हडपसर भागातील माळवाडीत घडली. सागर हा फिर्यादींच्या परिचयाचा असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. फिर्यादी यांना सागरकडून ४० हजार रुपये येणे होते. मुदत टळून गेल्यानंतर त्यांनी सागरला पैशांची विचारणा केली असता त्याने ‘कसले पैसे मागते, तुझ्यामुळेच माझे नुकसान झाले आहे,’ असे म्हणून शिवीगाळ केली. ही बाब फिर्यादीने आपल्या बहिणीस सांगितली. याचा राग येऊन सागरने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून ढकलले. यात फिर्यादी यांचा डावा पाय, मणका, खुबा फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी जाधव करीत आहेत.

खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी गजाआड

भारतनगर भागात काही दिवसांपूर्वी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अप्पर डेपो जवळील एका रिक्षात हे आरोपी बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

0