आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने नकार दिल्याने राजकीय व्यक्तींना दिल्या धमक्या:आमदार महेश लांडगे, अविनाश बागवे यांना धमकी देणारा तरुण पुण्यामध्ये अटकेत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी - चिंचवड येथील भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञाताने फोन करून धमक्या देऊन त्यांच्याकडे प्रत्येकी तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली होती. या सर्वांना धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली असून एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

इम्रान शेख (रा.घोरपडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख हा विवाह जुळवणी केंद्र चालवतो. त्याच्याकडे एका तरुणीचे विवाह नोंदणीसाठी प्रोफाइल आले होते. शेख याला ही तरुणी आवडली. त्याने स्वत: तरुणीला “मला तुझ्यासोबत लग्न करायचेय’ म्हणून सांगितले. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याने तरुणीची बदनामी करण्याच्या हेतूने तिचे नाव घेऊन राजकीय व्यक्तींना धमक्या दिल्या. तसेच खंडणी मागून मुलीच्या पत्त्यावर रक्कम आणून देण्याचे सांगितले. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याप्रकरणात त्याला अटक झाली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा हाच उद्योग सुरू केला. संबंधित तरुणी आपल्याला नाही म्हणाली केवळ याच कारणामुळे त्यांना राजकीय लाेकांना धमकी देणे सुरू केले. दरम्यान, पोलिस आता त्याची सर्व बाजुंनी चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.