आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Zika Virus । Pune Maharashtra । Purandar Tehsil । Maharashtra Health Department । Zika Virus Infection; News And Live Updates

​​​​​​​झिका व्हायरस:राज्यात झिका व्हायरसचे पहिले प्रकरण पुण्यात आढळले; 50 वर्षीय महिला संक्रमित, केरळमध्ये 63 रुग्ण

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1940 मध्ये आढळले होते पहिले प्रकरण

कोरोना पाठोपाठ आता झिका व्हायरसने ही महाराष्ट्रात इंट्री केली आहे. राज्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यातील पुरंदर भागातील 50 वर्षीय महिलेला याचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा चिकनगुनिया चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे केरळ राज्यात कोरोनासोबतच झिका व्हायरसचे रुग्ण वाढत आहे. केरळ राज्यात गेल्या 24 तासात दोन झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत राज्यात याची संख्या 63 वर पोहोचली आहे.

NIV च्या टीमने केला दौरा
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पुण्याच्या पुरंदर तहसीलमधील बेलसर गावाची रहिवासी आहे. जुलैच्या सुरुवातीला महिलेला ताप आला होता. यावितिरिक्त आणखी 4 जणांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 3 जणांचा चिकुनगुनिया अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर NIV ची एक टीम भेट देण्यासाठी येथे पोहोचली.

1940 मध्ये आढळले होते पहिले प्रकरण
झिका व्हायरसचे पहिले प्रकरण 1940 मध्ये युगांडामध्ये आढळले होते. परंतु, या व्हायरसने हळूहळू संपूर्ण देशात पाय पसरला सुरुवात केली. दक्षिण पॅसिफिक आणि आशियातील काही देशांना स्पर्श करून ते लॅटिन अमेरिकेत पोहोचले. ब्राझीलमध्ये त्याचा उद्रेक दिसून आला होता. 2014 च्या फुटबॉल विश्वचषकादरम्यान हे आशिया आणि दक्षिण पॅसिफिकमधून आले असावे असा काही तज्ञांचे मत आहे. परंतु, याबाबत अद्याप काही पुष्टी झालेली नाही.

लक्षणे काय आहेत?
झिका व्हायरस हा एडीस इजिप्ती नावाच्या डासाने पसरतो. या डासामुळे पिवळा ताप, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार होतात. हा व्हायरस संक्रमित आईमधून नवजात मुलांमध्येदेखील संक्रमित असून रक्तसंक्रमण आणि लैंगिक संभोगाद्वारे देखील पसरतो. या व्हायरसला शोधणे जरा अवघड काम आहे. कारण, हा डास चावल्याच्या 3 ते 12 दिवसात उच्च ताप, रॅशेज, डोकेदुखी, वेदना आणि चिन्हे तीव्र सांधेदुखी याचे लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...