आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण!:67 वर्षीय व्यक्तीला लागण; झिका व्हायरस म्हणजे काय? कसा पसरतो? घ्या जाणून

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. एका 67 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या रुग्णावर पुण्यातीलच एका रुग्णालयात उपचार सुरू असून या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.

एकीकडी गोवरची साथ त्यातच जपानी मेंदूज्वरानंतर झिका व्हायरचा रुग्ण आढळल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. जरी हा रुग्ण पुण्यात राहत असली तरीही ती मुळ नाशिकची आहे.

6 नोव्हेंबरला पुण्यात

प्राप्त माहितीनुसार, झिका बाधित रुग्ण हा मूळचा नाशिकचा आहे. ते 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात आले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर 22 ला ते सूरत येथे गेले होते. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. लागण झालेली व्यक्ती पुण्यातील बावधन परिसरात वास्तव्य होते असे सांगण्यात आले आहे.

ही आढळली लक्षणे

16 नोव्हेंबर 2022 ला 67 वर्षीय रुग्णाला पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या रुग्णाला भरती करताना ताप, खोकला, थकवा आणि सांधेदुखी ही लक्षणे जाणवत होती. त्यामुळे या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी ही व्यक्ती आली होती.

झिकाची लागण निष्पन्न

या रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत रुग्ण 18 नोव्हेंबर 2022 झिका बाधित असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या रुग्णाची पुण्यातीलच एनआयव्ही येथे 30 नोव्हेंबर 2022 रोजीतपासणी केली. अहवालात रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले. 22 नोव्हेंबरला पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आली.

बाधिताच्या परिसरात सर्वेक्षण

रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात घरोघरीकरण्यात आले. त्यावेळी या भागात एडीस डास असल्याचे आढळले नाही. या भागात धूरफवारणी देखील करण्यात आली आहे.

काय आहे झिका?

झिका विषाणूचा संसर्ग हा डासांमुळे होणारा व्हायरल संसर्ग आहे. हा संसर्ग डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांमध्ये विषाणू पसरवितात. गर्भवती महिलांवर झिका विषाणू प्रभाव करतो. यामुळे झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली होऊ शकते. मायक्रोसेफली हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते, जे मेंदूच्या विकासाच्या समस्यांशी संबंधित असू शकते.

असा पसरतो झिका

​​​​​​​झिका विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हे डास सहसा दिवसा चावतात. एखाद्या व्यक्तीस डास लावल्यामुळे संसर्ग झाल्यास झिका विषाणू त्यांच्या रक्तात काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ राहू शकतो. या संक्रमीत व्यक्तींना चावलेला डास इतर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरवू शकतो. झिका विषाणूचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्त्रोतांसारख्या इतर माध्यमांद्वारे होऊ शकतो.​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...